BIG BREAKING : चाकण परिसरातील बिरदवडी गावात तरुणाचा निर्घृण खून...!
![BIG BREAKING : चाकण परिसरातील बिरदवडी गावात तरुणाचा निर्घृण खून...!](https://news15marathi.com/uploads/images/202401/image_750x_65a56c6d38f17.jpg)
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : औद्योगिक परिसरातील बिरदवडी गावात ईश्वर पंडित पवार(वय -३२ वर्षे) तरुणाचा निर्घृन खून करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
चाकण औद्योगिक वसाहतीतील जमीन व MIDC संपादित जमिनीच्या मिळालेल्या पैशाच्या वादातुन हा खून झाल्याचे प्रथमदर्शी पोलीस तपासातून समोर आले आहे. खून केलेले दोनही आरोपी हे खून करण्यात आलेल्या तरुणाचे मामेभाऊ असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
सध्या चाकण औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक सुबत्ता आल्याने अनमोल जीवही काही व्यक्तींना नकोसा झाला आहे. ही औद्योगिक वसाहतीतील भयावह परिस्थिती भविष्य काळासाठी धोक्याची घंटा म्हंटले तरी चुकीचे ठरणार नाही. या खुनातील आरोपीच्या बाबतचा पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस करत आहेत.