मुस्लिम कब्रस्थानला वॉलकंपाऊंड व सौंदर्यकरण करण्याची खासदारांकडे मागणी...

मुस्लिम कब्रस्थानला वॉलकंपाऊंड व सौंदर्यकरण करण्याची खासदारांकडे मागणी...

प्रतिनिधी - गजू कैलासवार, पाटणबोरी (यवतमाळ)

पाटणबोरी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या पाटणबोरी येथील मुस्लिम कब्रस्थानला; वॉल कंपाऊंड नसल्याने कब्रस्थानची दुर्दशा झाली आहे. नाल्याचे पाणी मुस्लिम कब्रस्थान मध्ये जात असल्याने, पावसाळ्यात संपूर्ण कब्रस्थान पाण्याने भरलेले असते.

मुस्लिम कब्रस्थानला वॉल कंपाऊंडची आवश्यकता असल्याने, आज दिनांक 11 ऑगस्ट रोजी चंद्रपूर/आर्णी लोकसभेच्या खासदार प्रतिभा ताई धानोरकर यांना वॉल कंपाऊंडची मागणी करण्यात आली.

अनेक वर्षापासून आमदार, खासदार, ग्रामपंचायत कडे कब्रस्थांन करिता निधीच्या फंडची मागणी करण्यात आली. कब्रस्थान मध्ये पाणी, सभागृह, बसण्याकरिता खुर्च्यांची व्यवस्था नसल्यामुळे, मुस्लिम बांधवांना भर उन्हा-पावसात नमाज पडावी लागत आहे. त्यामुळे सभागृहाची अत्यंत आवश्यकता असल्यामुळे सभागृह देण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे. परंतु आजपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याने मुस्लिम कब्रस्थानची ही मागणी पूर्ण केली नाही. त्यामुळे येथील मुस्लिम समाजाचे समाज कार्य करणारे माजी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य अनिल पुल्लजवार, अक्रम गोरी, मोबींन तिघाले, सैयद गणी, सुरेश शर्मा काँग्रेस पार्टी शहर अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य दयाकर सिडाम, दिगंबर कोरीवार, अतुल कणाके या कार्यकर्त्यांनी वरोरा येथे जाऊन खासदार प्रतिभा ताई धानोरकर यांना निवेदन केले.