दिंडोरी पश्चिम भागात अवकाळी पावसाची तूफानी हजेरी.! शेतकरी वर्ग संकटात?
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यात शनिवार दि.११ रोजी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडासह कडकटात अवकाळी पावसाने बॅटिंग करून पश्चिम भागात शेतकरी वर्गाच्या शेतमालाचे नुकसान केले. तर काही ठिकाणी घरांचे पत्रे उडाले तर विद्युत खांब,विद्युत तारा,झाडे,कांदाचाळ आंबा याचे नुकसान झाले आहे त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामा करण्याची मागणी केली आहे.
काल रात्री १० वाजेच्या सुमारास सुमारे अर्धा तास वादळी वार्यासह विजेच्या कडकडाटात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.या पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचले आहे.पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकर्यांनी शेतात ठेवलेल्या कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली. विजेच्या कडकडाटासह वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावल्याने वीजप्रवाह खंडीत झाला होता. त्यामुळे दिंडोरी शहरासह काही गावात अंधाराचे साम्राज्य पसरले होते. जानोरी,वरवंडी,मोहाडी,पालखेड बंधारा,आंबेदिंडोरी,अक्राळे, वनारवाडी,मडकीजांब,जांबुटके, निळवंडी,पाडे,हातनोरे,निगडोळ, उमराळे,वलखेड,कोर्हाटे,लखमापूर, म्हेळूस्के,जोपूळ,मातेरेवाडी,वरखेडा, खेडगाव,सोनजांब,बोपेगाव, खडकसुकेणे,शिवनई,ओझे, करंजवण,कसबेवणी,मावडी, पांडाणे, तळेगाव दिंडोरी,इंदोरे आदी परिसरात अवकाळी काही ठिकाणी दमदार तर काही ठिकाणी तुरळक हजेरी लावली. तर काही ठिकाणी ग्रामीण भागात विद्युत पुरवठा ठप्प झाला होता. अनेक भागात वीज तारा तुटल्याने अनेक गावे रात्रभर अंधारातच होती. दिंडोरी शहरातही रात्री आठ वाजेपासून विद्युत पुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांना व व्यावसायिकांना अडचणीचा सामना करावा लागला. मात्र मध्यरात्री उशिरापर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला.
वादळी पावसामुळे वनारवाडी येथे दत्तात्रय ढुमणे,वरवंडी येथील मधुकर जाधव,सुरेश जाधव, रोशन डांगे यांच्या घरांचे पत्रे उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी दत्तात्रय यशवंत ढुमणे यांच्या गट नं १४९ मधील राहत्या घराचे संपूर्ण पत्रे उडून मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय दत्तात्रय ढुमणे यांच्या घरावरील पत्रे उडून या घरावरच विजेचा खांब पडल्याने विजेच्या तारा पत्र्यावर पडल्या होत्या मात्र वादळी वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याने पुढील अनर्थ टळला. परंतु पत्नी व सून यांच्या अंगावर घराच्या विटा पडल्याने त्यांना दुखापत झाल्याने त्यांना दिंडोरी येथे शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. झाली असून शासकीय रुग्णालय दिंडोरी येथे उपचार घेण्यात आले.पेठ तालुक्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळयुक्त अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने आंबा, भोपळा,टोमॅटो आदी शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बळीराजा पुन्हा एकदा हवालदिल झाल्याने या झालेल्या नुस्कानांचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.