एस.टी.महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांच्याकडून दिंडोरी बस्थानकाची पाहणी

एस.टी.महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांच्याकडून दिंडोरी बस्थानकाची पाहणी

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अध्यक्ष पदाची सूत्रे भरत गोगावले यांनी हाती घेताच दिंडोरी येथे आज शनिवार दि.२७ रोजी दुपारी बस स्थानकाला भेट देत प्रवाशांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

पेठ डेपोच्या अंतर्गत असलेले दिंडोरी बास्थानकाला भरत गोगावले, नितीन देशमुख,यांनी अचानक भेट दिली यावेळी इलेट्रिक बसची पाहणी करून प्रवाशांची विचारपूस केली, महिलांना एस टी प्रवासात अर्धे भाडे दिल्यामुळे महिलांनी समाधान व्यक्त केले. यावेळी दिंडोरी तालुक्यातुन शाळा,महाविद्यालय,आय टी आय च्या विद्यार्थ्यांनी अक्षदा चौरे, तेजस्विनी खांदवे,गौरी खुर्दळ,ईश्वरी खांदवे, सूनक्षी खांदवे यांनी वेळेवर बस उपलब्ध होत नाही,चालक विद्यार्थ्यांना बघून बस थांबवत नाही अश्या समास्यांचा पाढाच वाचला यावेळी आगारप्रमुख एस के धुळे यांना सूचना देत जो चालक विद्यार्थ्यांना बस मध्ये घेणार नाही त्याच्यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले.तसेच बस स्थानकाची दुरवस्था बघून बसस्थानकाचे काम लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

यावेळी माजी नगराध्यक्ष सचिन देशमुख,नगराध्यक्ष सुनीता लाहांगे,नगरसेवक रणजित देशमुख, सुजित मुरकुटे,संतोष गांगोडे, संदीप बर्डे,हेमंत पगारे,गुलाब जाधव,पप्पू धोंगडे,ओम राजे,अलकेश साबद्रा, घनश्याम देशमुख,निलेश पाडेकर, गणेश पगार,राकेश शिंदे सुजित जाधव किशोर जाधव पवन देशमुख आदींसह उपस्थित होते,