जानोरी येथे माहिती अधिकार दिन साजरा
![जानोरी येथे माहिती अधिकार दिन साजरा](https://news15marathi.com/uploads/images/202409/image_750x_66f6bd487cd61.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे दि.२८ सप्टेंबर हा दिवस जगभरात जागतिक माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो परंतु कित्येक वर्षापासून आपल्याकडे हा माहिती अधिकार दिन कसा साजरा करायचा हेच माहीत नाही परंतु जानोरी गावातील ग्रामपंचायत प्रशासनाने आज शुक्रवार दि.२७ रोजी पहिल्यांदाच माहिती अधिकारदिन साजरा केला.व माहिती अधिकार कायद्याचा प्रसार प्रचार व्हावा ह्या उद्देशाने ग्रामस्थांसाठी माहिती अधिकार कायद्यावर मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी माहिती अधिकार कायदा कोणी वापरावा कसा वापरावा आणि लोकांच्या हितासाठी कसा योग्य आहे याबद्दल माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे दिंडोरी तालुका अध्यक्ष संतोष विधाते यांनी मार्गदर्शन केले.उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ व कायद्याचे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सरपंच सुभाष नेहरे उपसरपंच हर्षल काठे व ग्रामपंचायत सदस्य अधिकार कार्यकर्ते महासंघाचे उपाध्यक्ष वैशाली झोमान, सोमनाथ वतार,सचिन कुयटे,आदींसह सरकारी कर्मचारी ग्रा.प.कर्मचारी आरोग्य कर्मचारी महावितरण कर्मचारी शिक्षक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.