दिंडोरी येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या...

दिंडोरी येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी येथील कार्यरत असलेले प्रशासकीय अधिकारी यांच्या नुकत्याच बदल्या झाल्याने त्यांच्या जागी नवीन प्रशासकीय  अधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्या. यामध्ये दिंडोरीचे तहसीलदार पंकज पवार यांची धुळे येथे संजय गांधी योजना तहसीलदार म्हणून बदली झाली असून त्यांच्या जागी मुकेश कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच दिंडोरी येथे कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांची पोलीस उपअधीक्षक आदिवासी विकास जात पडताळणी समिती येथे बदली झाली असून त्यांच्या जागी मालेगाव छावणी ठाणे येथील रघुनाथ शेगर हे रुजू झाले तर दिंडोरी नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी वैभव लोंढे यांची बदली झाल्याने ते राहता नगरपंचायत येथे मुख्याधिकारी म्हणून काम बघणार आहे त्यांच्या जागी संदीप चौधरी हे अधिकारी रुजू झाले आहे. 

या तिन्हीही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये तालुक्यातील जनतेला योग्य न्याय देऊन कामांमध्ये प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली असून नव्याने रुजू झालेल्या तिन्हीही प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून हीच तालुक्यातील जनतेला अपेक्षा आहे.