महात्मा बसवेश्वर यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने, जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडेमारो आंदोलन...
![महात्मा बसवेश्वर यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने, जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडेमारो आंदोलन...](https://news15marathi.com/uploads/images/202310/image_750x_652f975c56603.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख, लातूर
महात्मा बसवेश्वर यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ लातूरमध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्यावतीने; जोडेमारो आंदोलन युवा मोर्चा शहर जिल्हाअध्यक्ष ॲड. गणेश गोमचाळे व प्रदेश प्रवक्ते प्रेरणाजी होनराव याच्या नेृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विविध संघटना, वेगवेगळे पक्ष आणि समाज बांधवांनी हजेरी लावली होती.
महात्मा बसवेश्वर यांच्या बद्दल आक्षेपरी विधान केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या बद्दल संपूर्ण राज्यांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. पत्रकार परिषदेमध्ये उदाहरण देताना त्यांचे संदर्भ चुकले होते. महात्मा बसवेश्वर यांचा एकेरी उल्लेख करण्यात आला होता. यामुळे विविध ठिकाणी त्याच्या व्यक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. आज सकाळी ११ वाजता लातूर शहरातील महात्मा बसवेश्वर चौकात निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
या वेळी जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड यांचा निषेध व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.
या प्रसंगी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाअध्यक्ष ॲड. गणेश गोमचाळे व प्रदेश प्रवक्ते प्रेरणा होनराव, मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस गजेंद्र बोकन, आकाश बजाज, अँड. शितल औसेकर, संतोष तिवारी, नितीन लोखंडे, पंकज शिंदे, राहुल भुतडा, पांडुरंग बोडके, अरुण जाधव, लखन कावळे, दुर्गेश चव्हाण, शंकर नागभुजंगे, जगदिश मलंग, वैभव कांबळे, सूर्यकांत वाले, किशोर कवडे आदिजन उपस्थित होते.