खडकसुकेणे येथे मधुमक्षिका पालनाची केली कृषिकन्यांनी जन जागृती

खडकसुकेणे येथे मधुमक्षिका पालनाची केली कृषिकन्यांनी जन जागृती

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

 मराठा वि‌द्या प्रसारक समाज संचालित कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय नाशिक येशील कृषिकन्या वैभवी कोळी, प्रियंका लांडबिले,साक्षी कुटे,कोमल खैरणार,निकिता मेहेरखांब,आकांशा खटावकर,श्रुती मेशरम यांनी मधुमक्षिका पालनाचे फायदे , पर्यावरणातील महत्त्व तसेच भविष्यातील व्यवसायाच्या संधी या संदर्भात मार्गदर्शन  केले. 

यावेळी कार्यशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मधमाशीचे शेतीमधील महत्त्व, मधमाशांचे प्रकार, त्यांच्या मधपोळ्याची वैज्ञानिक रचना, मधाच्या अनुषंगाने फुलांच्या झाडाची लागवड, मधमाशी पालनासाठी योग्य असणारी अवजारे, कीड रोग आणि त्यांचे नियंत्रण, मधमाशीपासून मिळणारे विविध पदार्थ तसेच विविध हंगामात पेटीची घ्यावयाची काळजी, मधाचे विविध प्रॉडक्शन व फायदे, भारतातील आणि परदेशातील मधमाशी पालनातला फरक,पेटीची हाताळणी व निरीक्षण आणि सरकारच्या मधमाशी पालनासंदर्भातील शासनाच्या विविध योजनांवर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर सरपंच सुनिता वाघ, उपसरपंच मुक्ता गणोरे, प्राचार्य डॉ.बि.डी.भाकरे, समन्वयक प्रा.श्वेता सातपुते, प्रा.डॉ.डी.एस शिंदे आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.