चिंचखेड सोसायटीच्या संचालकपदी रवींद्र जगताप...

चिंचखेड सोसायटीच्या संचालकपदी रवींद्र जगताप...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या रिक्त झालेल्या जागी संचालकपदी रवींद्र जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सोसायटीचे माजी चेअरमन प्रवीण पाटील यांनी निवडणूच्या वेळी संचालकपदाच्या दोन जागा जिंकल्याने त्यांनी एका जागेचा राजीनामा दिल्यानंतर या रिक्त झालेल्या जागेवर संचालक म्हणून रवींद्र जगताप यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

निवडणूक पूर्वी क्रांती पॅनलच्यावतीने संचालक पदासाठी शब्द दिला होता आणि तो शब्द प्रत्यक्षात खरा केला. याशिवाय गणेश संधान यांनी सोसायटीच्या संस्थेत लिपिक होणे कामे आपला संचालक पदाचा राजीनामा दिल्यामुळे दुसऱ्या रिक्त संचालक पदाच्या जागी माणिकराव पाटील यांचीही वर्णी लागली.या दोन्हीही संचालकांचे चिंचखेड ग्रामपंचायत सदस्य सुरेखा शिवानंद संधान यांनी औक्षण केले. या दोन्हीही संचालकांचा संचालक मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. 

यावेळी सोसायटीचे चेअरमन एकनाथ मातेरे व्हा  चेअरमन सुलोचना फुकट,संचालक प्रवीण पाटील,बाळासाहेब जगताप,रामनाथ गायकवाड, शिवानंद संधान, बापूसाहेब पाटील, सुनील मातेरे, भाऊसाहेब पाटील,मंजुळाबाई फुगट, संतोष शिंदे,सचिव केशव गावित, लिपिक विलास संधान,गणेश चंदन माणिक पवार, आधी उपस्थित होते.