शरद पवार गटाच्या खासदाराने दिला राजीनाम्याचा इशारा.! बजरंग सोनवणे याचं मोठं वक्तव्य...

बीड जिल्हया सध्या कराड आणि खोक्याच्या कारनाम्याने चर्चेत असताना; आता बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी चक्क राजीनाम्याची भाषा केल्याने; अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. जिल्ह्यातील बिंदू नामावली वादावरून निर्माण झालेल्या वादंगावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) खासदार बजरंग सोनवणे यांनी स्पष्ट भूमिका मांडत; कोणत्याही गैरप्रकारात स्वतःचा सहभाग सिद्ध झाल्यास आपण जिल्ह्यातील जनतेची माफी मागून त्वरित राजीनामा देईन असे त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे.
तर याचप्रसंगी त्यांनी भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्याशी दूरध्वनीवर संपर्क साधल्याची कबुली दिली. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
बिंदू नामावलीसंदर्भात ओपन प्रवर्गावर अन्याय होत असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली. या वादात त्यांचं नाव जोडले गेल्याच्या पार्श्वभूमीवर सोनवणे म्हणाले की, जर कोणी ठोस पुरावे समोर आणले; तर मी संपूर्ण बीड जिल्ह्याच्या जनतेची माफी मागून खासदारकीचा राजीनामा देईन. यामुळे त्यांनी स्वतःवर होणाऱ्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलं आहे. तसेच पंकजा मुंडे यांनी केलेल्या फोन कॉलबाबत सांगत त्यांनी या प्रकरणात अधिक पारदर्शकता दर्शवली.