मोठी बातमी : महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणारे चोर जेरबंद, महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे धडाकेबाज कारवाई...!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
महाळुंगे(इं): महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्या एका चोरट्यासह दोन अल्पवयीन बालकांना महाळुंगे MIDC पोलीसांनी जेरबंद करून तब्बल साडेतीन लाखाचे दागिने जप्त केले आहे. याच बरोबर आरोपीकडून अजून चार गुन्हे उघडकीस आणण्यास महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याच्या तपास पाठकांला यश मिळाले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून, बुधवार(दि. २)रोजी रात्री १०:१५ वाजताच्या सुमारास वासुली गावच्या हद्दीत अर्चना दिपक लिंभोरे या जेवण करून घराच्या जवळ शतपावली करत असताना अज्ञात चोरट्यानी मोटार सायकलवरून येऊन महिलेच्या गळ्यातील सव्वा लाख रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावून चोरून नेले. त्याच दिवशी लागोपाठ ३ चैन स्नॅचिगच्या घटना समोर आल्या होत्या.
याच घटनाच्या अनुषंगाने वरिष्ठाच्या आदेशाने तात्काळ चोरट्याचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महाळुंगे महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांच्या सूचनेनुसार तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे व अंमलदार यांनी तांत्रिक साधने व सिसिटीव्ही फुटेज तपासून एक संशयित मोटार सायकल व त्यावरील ३ व्यक्ती यांच्या संशयास्पद हालचाली यांची माहिती घेतली.
या सगळ्या सखोल तपासानंतर तपास पथकातील पोलीस नाईक संतोष काळे व इतर अंमलदार यांनी वासुली गाव परिसर ते कामशेत परिसर असे ४५ किमीतील अंतर्गत रस्त्यावरील सिसिटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांची ओळख पटवून शोध लावला. या घटनेत सहभागी असलेले दोन १७ वर्षीय यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तपास केला असता त्यांनी चोरीची कबुली दिली. सदर आरोपी यांच्याकडून जबरीने चोरी केलेले ३ लाख ५७ हजार रुपये किमतीचे ५ तोळे, ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने १०० टक्के ऐवज व गुन्ह्यातील वापरलेली पल्सर मोटार सायकल जप्त केली आहे. जप्त केलेली मोटार सायकलही चाकण येथून चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
अल्पवयीन आरोपी यांच्याकडून महाळुंगे MIDC पोलीस ठाणे, देहूरोड पोलीस ठाणे, चाकण पोलीस ठाण्यात २ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
सदर कारवाई महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, पोलीस अंमलदार राजू कोणकेरी, युवराज बिराजदार, तानाजी गाडे, विठ्ठल वडेकर, अमोल बोराटे, किशोर सांगळे, संतोष काळे, अमोल निघोट, गणेश गायकवाड, शिवाजी लोखंडे, संतोष वायकर, राजेंद्र खेडकर, अमोल माटे, मंगेश कदम, राजेश गिरी यांनी केली. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे हे करीत आहेत..