शेतकर्‍यांना सोयाबीन बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक...

शेतकर्‍यांना सोयाबीन बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील जांबुटके, निळवंडी,पाडे,हातनोरे, वाघाड येथील शेतकर्‍यांना नुकतेच सोयाबीन उगवण क्षमता तपासणी व बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक कार्यक्रमाव्दारे शेतकर्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले. 

उपविभागीय कृषीअधिकारी अशोक दमाले,तालुका कृषी अधिकारी विजय पाटील,मंडळ कृषी अधिकारी प्रमोद गोल्हाईन,कृषी पर्यवेक्षक शामकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.यावेळी कृषी सहाय्यिका रेणूका सातपुते यांनी भात पिकासाठी तीन टक्के मिठांच्या द्रावणांची बिजप्रक्रिया,२.५ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास थायरम,२५ ग्रॅम अ‍ॅझोटोबॅक्टर,२५ ग्रॅम स्फुरद विरघळणारे जिवाणू तसेच सोयाबिन बियाण्यासाठी ५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास ट्रायकोटूर्मा चोळावे, रायझोेबियमा पी.एस.बी. २५० ग्रॅम १० किलो बियाण्यास हलक्या हाताने चोळावे व घरगुती सोयाबीनची उगवण क्षमता एका पोत्यावर १०० बिया घेऊन १० बियाण्याच्या १० ओळी तयार करुन पोत्याची गुंडाळणी करुन ठेवणे, त्यानंतर ४ दिवसांची उगवण क्षमता किती टक्के येते हे तपासणे अशा प्रकारची प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात आले. तसेच कृषी विभागाच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजना फळबाग लागवड, कृषी यांत्रिकीकरण,शेततळे, ठिंबक क्रॉपसॅप निरीक्षणे,हॉटसॅप निरीक्षणे, कृषीक अ‍ॅप विविध योजनांची माहिती देण्यात आली.यावेळी शेतकर्‍यांनी या शिबिरास चांगला प्रतिसाद दिला.