तुर पिकावर अळीचा प्रकोप, हजारो हेक्टर क्षेत्रातील तुर पिकाच्या नुकसानीची शक्यता...

तुर पिकावर अळीचा प्रकोप, हजारो हेक्टर क्षेत्रातील तुर पिकाच्या नुकसानीची शक्यता...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - साहिल रामटेके, साकोली

मागील एक आठवड्यात पासून नियमित अंतराने येत असलेल्या ढगाळ वातावरणासह झालेल्या अवकाळी पावसाने तूर पिकावर मोठ्या प्रमाणात अळीचा प्रकोप झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तथापि, या कीट रोगाच्या प्रकोपाने तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील तुर पिकांच्या नुकसानीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, यंदाच्या खरिपात तालुक्यातील विविध भागातील तब्बल २ हडार २११.२० हेक्टर क्षेत्रात तुर पिकांची लागवड करण्यात आली आहे. तथापि, या लागवडी अंतर्गत शेतकऱ्यांनी तुर पिकाच्या पर्याप्त उत्पादनासाठी कित्येकदा विविध किटकनाशकांची फवारणी देखील केली आहे. त्यामुळे तालुक्यातील विविध भागातील तूर पिक फुलांनी बहरून लहरत होते.

दरम्यान, मागील एक आठवड्यापासून नियमित अंतराने तालुक्यातील विविध भागात ढगाळ वातावरण दिसून येत आहे. त्यामुळे तालुक्यातील विविध भागात अवकाळी पाऊस अंतर्गत रिमझिम पाऊस देखील होत आहे. यामुळे शेतात लहरणाऱ्या तुर पिकावर मोठ्या प्रमाणात अळीचा प्रकोप झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तथापि, फुलोऱ्यावर असलेल्या काही क्षेत्रातील तुर पिकाला येत्या काही दिवसांत दाणे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात होती तर काही क्षेत्रातील तुर पिकांना लागलेली दाने भरली असल्याने येत्या काही दिवसात कापणी सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. दरम्यान ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाने तूर पिकांवर अळीचा प्रकोप झाल्याने हजारो हेक्टर क्षेत्रातील तुर पिकांच्या नुकसानीची शक्यता व्यक्त केली जात आहे. तथापि, तूर पिकांच्या लागवडीसह पर्याप्त उत्पादनासाठी यापूर्वीच विविध किटनाशक औषधांची फवारणी करण्यात आली आहे. अवकाळी पावसाने पिकांवर अळीचा प्रकोप आल्याने तुर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करून शेतकऱ्यांत नाराजी व्यक्त केली जात आहे.