लातूरमध्ये कृषी विभाग ॲक्शन मोडवर.! रात्री उशिरापर्यंत अनेक कृषी केंद्राच्या गोडाऊनवर धाडी...

लातूरमध्ये कृषी विभाग ॲक्शन मोडवर.! रात्री उशिरापर्यंत अनेक कृषी केंद्राच्या गोडाऊनवर धाडी...

प्रतिनिधी - असलम शेख, लातूर

- बनावट खताच्या गोडाऊनवर रात्री उशिरा कृषी विभागाच्या धाड...

- अंदाजे 4 लाख रुपयांचा बनावट खत केला जप्त...

- लातूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी बनावट DAP (डी.ए.पी.) खताचा सुळसुळाट....

खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी सद्या बाजारात बी-बियाणे खत खरेदीसाठी गर्दी करत आहेत अशातच शेतकऱ्यांकडून विशिष्ट एका मागणी होते., त्यामुळे त्या खताचा आणि बियाण्याचा तुटवडा करून चढ्यादर्याने विकणाऱ्या किनगाव येथील माऊली कृषी सेवा केंद्र आणि चाकूर येथील जाधव कृषी तसेच विठ्ठल कृषी सेवा केंद्र या सेवा केंद्रांच्या गोडाऊन वर धाडी टाकून बनावट DAP (डीएपी) खताच्या जवळपास 260 गोण्या कृषी विभागाने कारवाई करत बियाणे व खते अधिनियम कायदे अंतर्गत पोलिसात गुन्हा दाखल केलाय.