शेतकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा.! पीक कर्ज वसुलीला दिली स्थगिती

शेतकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा.! पीक कर्ज वसुलीला दिली स्थगिती

NEWS15 मराठी रिपोर्ट - मुंबई

नापिकी, पावसाचा कहर आणि आता कोरडा दुष्काळ ह्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारच्या वतीने पीक कर्ज वसुलीसाठी स्थगिती देण्यात आली असून, दुष्काळ आणि दुष्काळसदृश्या परिस्थितीत घोषित केलेल्या 40 तालुक्यांमधे ही स्थगिती असणार आहे. यासह इतर तालुक्यांतील 1021 महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून काही सवलती लागू करण्यास शासनाने मंजूरी दिली आहे.

अतिवृष्टीमुळे आणि त्यानंतर उद्भवलेल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. त्याचप्रमाणे ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये सरासरी पर्जन्याच्या 75 टक्के कमी पाऊस झाला, त्या भागामध्ये दुष्काळ जाहीर केला गेला. एकूण 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. राज्यातील 15 जिल्ह्यातील 24 तालुक्यामध्ये गंभीर तर 16 तालुक्यांमध्ये मध्यम दुष्काळ जाहीर झाला.

महसूल विभागाकडून पुढील निर्णयांना स्थगिती देण्यात आली. 

1) जमीन महसूलात सूट. 2) रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता. 3)  शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती. 4) आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर.  5) शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या परिक्षा शुल्कात माफी. 6) सहकारी कर्जाचे पुनर्गठन. 7) कृषी पंपाच्या चालू विजबिलात ३३.५% सूट. 8) टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतक-यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे. इत्यादि  सवलती लागू होतील. 

स्थगिती मिळालेले राज्यातील दुष्काळी जिल्हे आणि तालुके खालील प्रमाणे...  

1. जिल्हा छत्रपती संभाजीनगर  – सोयगाव, छत्रपती संभाजीनगर तालुका 2. जिल्हा नाशिक- मालेगाव , सिन्नर, येवला , तालुका 3. जिल्हा पुणे – पुरंदर सासवड , बारामती, तालुका , शिरूर घोडनदी , दैड, इंदापूर तालुका  4. जिल्हा जळगाव- चाळीसगाव तालुका 5. जिल्हा बुलढाणा – बुलढाणा आणि लोणार तालुका 6. जिल्हा जालना – भोकरदन , जालना ,बदनापूर ,अंबड, मंठा तालुका 7. जिल्हा बीड – वडवणी ,धारूर , अंबेजोगाई , तालुका 8. जिल्हा नंदुरबार – नंदुरबार तालुका 9. जिल्हा धुळे – सिंदखेडा तालुका 10 जिल्हा लातूर – रेणापूर , तालुका 11. जिल्हा कोल्हापूर – हातकंगले, गढहिंगलज , 12. जिल्हा सांगली – शिराळा , कडेगाव , खानापूर विटा , मिरज तालुका 13. जिल्हा धाराशिव – वाशी , धाराशिव , लोहारा , तालुका 14. जिल्हा सोलापूर – बार्शी ,माळशिरस , सांगोला , करमाळा,माढा तालुका 15. जिल्हा सातारा – वाई ,खंडाला ,