पावसाअभावी पिके व्हेंटीलेटरवर.! नांदेड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी...

पावसाअभावी पिके व्हेंटीलेटरवर.! नांदेड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बालाजी घडबळे, नांदेड

हदगाव व हिमायतनगर तालुक्यात पावसा अभावी पिकांची वाढ खुंटेली असून, पिके सुकू लागल्याने तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन.! आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी मदत व पुनर्वसन मंत्री  अनिल पाटील यांना दिले आहे.

जुलै महीण्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे, सुगी चांगली आली असली तरी, ऑगस्टच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाला नाही. आणि ऑगस्ट महिना संपला तरी पावसाचा बेपत्ता असल्याने, शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे खिळल्या आहेत. प्रचंड उकाडा व कडाक्याच्या उन्हामुळे सोयाबीन, हळदीसारखी पिके सुकायला लागली आहेत. खडकाळ जमीनीवरील पिकांनी तर माना टाकल्या आहेत. अशीच स्तिथी अजून 10 दिवस राहीली तर शेतकऱ्यांच्या नशीबी कोरड्या दुष्काळाला तोंड देण्याची येईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस होत असलेल्या प्रचंड वृक्षतोडीमुळे जंगले नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. तर शेतातील झाडेही शेतकरी तोडुन टाकत असल्याने, निसर्गाच्या लहरी पणाचा शेतकऱ्यांसह सर्वांनाच सामना करावा लागत आहे. एकुणच परिस्थिती गंभिर असुन सरकार कोरडा दुष्काळ जाहीर करेल का याची शेतकरी वाट बघत आहेत.