हणमंतवाडी येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने ११ एकर पपईच्या बागेचे नुकसान...
![हणमंतवाडी येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने ११ एकर पपईच्या बागेचे नुकसान...](https://news15marathi.com/uploads/images/202406/image_750x_666578629bf12.jpg)
NEWS15 मराठी - प्रतिनिधी सुधाकर सूर्यवंशी, निलंगा
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात गेल्या दोन दिवसांत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे फळबागांचे नुकसान झाले.
वादळी वारे आणि पावसामुळे तालुक्यातील हणमंतवाडी (मुगाव) येथील शेतकऱ्यांचे ११ एकरवरील पपईच्या बागेचे मोठे नुकसान झाले. उन्हाळ्यात पाणीटंचाई असतानाही कसेबसे जगवलेली बाग वादळी वाऱ्यासह पावसाने पूर्णता नष्ट झाल्याने या शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय.