केळगाव परिसरात वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, अनेक एकरावरील ऊस व रब्बी पिके भुई सपाट...

केळगाव परिसरात  वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, अनेक एकरावरील ऊस व रब्बी पिके भुई सपाट...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - सुधाकर सूर्यवंशी, निलंगा

निलंगा तालुक्यातील केळगाव परिसरामध्ये काल सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनेक एकर उस आडवे पडले असून, रब्बीची ज्वारी, तुर भुईसपट झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला याचा आर्थिक फटका बसला आहे.

सविस्तर वृत्त असे की 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी निलंगा तालुक्यासह केळगाव निटूर, खडक उमरगा, काटेजवळगा, राठोडा या गावांमध्ये सायंकाळी रात्री उशिरापर्यंत वादळी वारा विजांचा कडकडाट व पाऊस सुरू होता. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या हाताला आलेले पीक हे भूईसपाट झाले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ऊस, ज्वारी व तूर या पिकाची नुकसान झाले आहे. विशेष म्हणने  केळगाव येथील शेतकरी यादव काळे यांचा चार एकर वरील ऊस भुईसपाट झाला आहे. तसेच नितीन काळे, दत्ता काळे, फकीर  डाळिंबकर, मिरसाब डाळिंबकर सह अनेक शेतकऱ्याची ही नुकसान झालेली आहे. तरी सरकारने दखल घेऊन पंचनामे करावे अशी मागणी आहे शेतकरी यादव काळे यांनी केली आहे.