मध्य हंगाम विमा लागू करावा - आमदार बाबासाहेब पाटील यांची मागणी...

मध्य हंगाम विमा लागू करावा  -  आमदार बाबासाहेब पाटील यांची मागणी...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख, लातूर

मध्य हंगाम विमा लागू करावा  अशी मागणी आमदार बाबासाहेब पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदनाद्वारे केली आहे. लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदी नव्याने रुजू झालेल्या श्रीमती वर्षाताई ठाकूर - घुगे यांची सत्कार पर भेट व अभिनंदन करून, यावेळी त्यांनी निवेदन दिले आहे. 

अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील अहमदपूर व चाकूर तालुक्यामध्ये एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून पावसाने खंड दिला आहे. त्यामुळे पिके सुकून जात आहेत. तरी अहमदपूर व चाकूर तालुक्यामध्ये 21 दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड पडलेल्या महसूल मंडळात मध्य हंगाम विमा लागू करण्याच्या मागणीचे निवेदन आ. बाबासाहेब पाटील यांनी  जिल्हाधिकारी यांना दिले. सलग 21 दिवसांपेक्षा जास्त पावसाने खंड दिला तर मध्य हंगाम पीक विमा लागू करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना असतो. असे या निवेदनात आ. बाबासाहेब पाटील यांनी नमूद केले आहे.

प्रसंगी समवेत चाकूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यशवंतराव जाधव, येलादेवी उमरगा चेअरमन राजकुमार सोमवंशी, मनोज पाटील आदी उपस्थित होते.