निलंगा भागात प्रचंड पाऊस झाल्याने शिवणी कोतल ते आनंदवाडी रस्ता बंद...
![निलंगा भागात प्रचंड पाऊस झाल्याने शिवणी कोतल ते आनंदवाडी रस्ता बंद...](https://news15marathi.com/uploads/images/202406/image_750x_666477a77b0c8.jpg)
प्रतिनिधी - सुधाकर सूर्यवंशी, निलंगा (लातूर)
निलंगा तालुक्यातील कोतल शिवणी ते आनंदवाडी दरम्यान असलेल्या शामगीर नदीच्या प्रचंड पाणी वाढल्याने, आनंदवाडीकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे .
(आज) दि. 8 जून रोजी दुपारनंतर झालेल्या पावसामुळे जागोजागी रस्ते बंद झालेली आहे. तर शामगीर पात्रात पुल लहान असल्याने पुलावरती चार फुट पाणी आहे. त्यामुळे दोन्ही गावचा संपर्क तुटला आहे. तसेच रस्ता बंद असल्याने दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे.
प्रत्येक पावसाळ्यात रस्ता व पुल नसल्याने दोन्ही गावांना यांचा ञास सहन करावा लागत आहे. कोतल शिवणी ते आनंदवाडी दरम्यान पुल उभारावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत .