हजरत पीर गैबी बाबांचा संदल उत्साहात संपन्न...

हजरत पीर गैबी बाबांचा संदल उत्साहात संपन्न...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख, लातूर

अहमदपुर तालुक्यातील किनगाव येथील हजरत पीर गैबीबाबा यांचा उरूस चालू झाला असून, या निमित्त सरपंच श्रीमती सुमित्राबाई एकनाथराव वाहुळे यांचे सुपुत्र रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल एकनाथराव वाहुळे, उपसरपंच विठ्ठलराव बोडके, सहायक पोलीस निरिक्षक भाऊसाहेब खंदारे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र कांबळे, तलाठी हंसराज जाधव, चेअरमन ॲड. भास्करराव मुंढे, उरूस कमिटीचे अध्यक्ष सलीम जलीलसाब बागवान, उपाध्यक्ष शुभम सुभाषराव मुंढे, दक्षता समिती अध्यक्ष धनंराज बोडक आदी ग्रामस्थाच्यावतीने; 'संदल ' दि.१७/०१/२०२४ रात्री ८.०० वाजता  हजरत पिर गैबीबाबा यांच्या मजार (तुरबत ) वर चॉदर चढविण्यात आली.

या संदल कार्यक्रमाची सुरुवात ग्रामपंचायत कार्यालय पासून ढोल - ताशा वाजत गावतील मुख्य रस्त्यावरून संदल काढला. रात्री १० वाजता सलाम पठन करून चादर चळविण्यात आली. 'सलाम पठण ' रहिमखां पठाण, रहेमतमियाँ देशमुख, शैकतशहा, बाबु मुसा, जुबेर शेख आदीने केले.