विविध मागण्यांसाठी आंगणवाडी सेविकेंचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन...
![विविध मागण्यांसाठी आंगणवाडी सेविकेंचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन...](https://news15marathi.com/uploads/images/202401/image_750x_65a899e413168.jpg)
प्रतिनिधी - ईश्वर परसलवार, गडचिरोली
आंगणवाडी महिलांच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री यांना तहसीलदारांच्यावतीने देण्यांत आले. जो पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही; तो पर्यंत आगणवडी महिला कार्यकर्त्या व मदतनिसांचे राज्यव्यापी आंदोलन सुरू राहील विठाबाई भट, आगणवाडी कर्मचारी संघटनेचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष यांचे जाहीर आव्हान.
मागील 44 दिवसापासून राज्यातील दोन लाख आंगनवाडी सेविका आणि मदतनीस यांचा बेमुदत संप अनेक जवलंत समस्यांना घेऊन पुकारला आहे. त्या अनुसंगाने एटापल्ली, अहेरी आणि भामरागड तालुक्यातील आगणवाडी कार्यकर्त्या व मदतनीस यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे तहसीलदार एटापल्ली यांच्यावतीने निवेदन देण्यांत आले आहे. सदर निवेदनातील प्रमुख मागण्या; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आंगनवाडी महिलांना कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यांत यावी व तोपर्यंत 26000 हजार रुपये किमान वेतन देण्यांत यावे, तसेच रज्यविधी मंडळात दिलेल्या आश्वासनना प्रमाणे वेतनाच्या निम्मे पेन्शन देण्यात यावा, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ग्राचुटी देण्यांत यावे आणि मदतनीस यांना सेविकांच्या मानधनाच्या 80 टक्के मानधन देण्याची मागणी केली आहे.
मागणीचे निवेदन देण्यापूर्वी आंगनवाडी कार्यकर्त्या व मदतनीस नी जिल्हा परिषद मैदानात एकत्र येऊन सरकारच्या विरोधात घोषणा देत सरकारचा निषेध केला आणि आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत संप सुरू राहील अशी ग्वाही आंगनवाडी कर्मचारी संघटनेचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष विठाबाई भट यांनी जाहीर आव्हान केले आहे.