कांदा अनुदान द्या, कॉंग्रेस कार्याध्यक्षांची राज्यशासनाकडे मागणी...

कांदा अनुदान द्या, कॉंग्रेस कार्याध्यक्षांची राज्यशासनाकडे मागणी...

NEWS15 प्रतिनिधी - बापू चव्हाण

नाशिक : दिंडोरी तालुक्यात कांदा अनुदानाचे ८ कोटी ९ लाख रुपये राज्यशासनाकडे थकले असून, शासनाने तातडीने अनुदान द्यावे अशी मागणी; कॉंग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष  वाळू जगताप यांनी केली आहे.

वाळू जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे कि, भाजप सरकारने वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी विविध योजना जाहीर केल्या व नुकसान भरपाई जाहीर केली. परंतु त्यांची केवळ जाहिरातच झाली. योजना प्रत्यक्षात पोहोचल्या नाहीत. शेतकऱ्यांसाठी मार्च - फेब्रुवारी २०२३ मध्ये कांद्यास ३५० रुपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर केले. त्यात शेतकऱ्यांनी कांदा अनुदान मिळेल म्हणून धावपळ करून तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक या समितीच्या संयुक्त सहीचे अहवाल बाजार समितीकडे जमा केले. 

दिंडोरी तालुक्यात सुमारे ४,१५७ अर्ज कांदा अनुदानासाठी प्राप्त झाले होते. त्यापैकी ३,५१८ शेतकरी कांदा अनुदानासाठी पात्र ठरले. सुमारे ६३९ शेतकरी अपात्र ठरले. आजमितीस राज्य शासनाकडे ८ कोटी ९ लाख रुपये दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे अनुदान येणे बाकी आहे. सध्या शेतकऱ्यांची अडचण चालू असल्याने; शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे. तरी शासनाने तातडीने हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कॉंग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष वाळू जगताप यांनी दिला आहे.