पालखेड बंधारा येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक संपन्न...
![पालखेड बंधारा येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक संपन्न...](https://news15marathi.com/uploads/images/202310/image_750x_652b7cc6b781d.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथे कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांचे मार्गदर्शनाखाली; ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक संपन्न झाली.
येथील ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत बोलताना कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी; जास्तीत जास्त सभासद शेतकऱ्यांनी उसाची लागवड करावी.! ऊस हे पीक शेतकऱ्यांना शंभर टक्के पैसा मिळवून देणारे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस शेतीकडे वळावे प्रत्येकाने ऊस लागवड करताना एक डोळा पद्धतीने लागवड करावी, ठिबक सिंचनाचा वापर करावा, दोन सरीमध्ये अंतर चार पाच फुटाचे असावे. तसेच विजेच्या संदर्भात अधिकृत कनेक्शनची मागणी करा, ऊसासाठी पाणी परवानगीसाठी अर्ज करा तसेच कारखाना उसाचे रोपे, ठिबक सिंचन व खते यासाठी लागणारे कर्ज देईल व नंतर ऊस गळीतास आल्यास त्यावेळेस अल्प व्याजदराने त्याची वसूली केली जाईल असेही सांगितले.
यावेळी अनेक शेतकऱ्यांनी यांनी कादवा कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस तोडीला प्रथम प्राधान्य द्यावे जेणेकरून ऊसतोड लवकर होईल व शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही असे सांगितले. याप्रसंगी संचालक दिनकर जाधव, शहाजी सोमवंशी, विश्वनाथ देशमुख, शिवाजीराव बस्ते, शार्दुल मधुकर गटकळ, रामदास पिंगळ, रावसाहेब कक्राळे, दौलतराव गायकवाड, पुंडलिक गायकवाड, आनंदराव पवार, बाळासाहेब पवार, हिरामण मिठे, संजय पवार आदींसह ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.