BREAKING.! किनगाव येथील माऊली कृषी केंद्रावर कृषी अधिकाऱ्यांची धाड...

BREAKING.! किनगाव येथील माऊली कृषी केंद्रावर कृषी अधिकाऱ्यांची धाड...

प्रतिनिधी - असलम शेख, लातूर

DAP (18 - 46-0 ) बनवट खताच्या बॅगची विक्री करून शेतकऱ्याची फसवणूक.! रेणापूर तालुक्यातील खलंग्री - सारोळा रोड शेतातील पत्र्याच्या शेड मध्ये बनावट खताच्या साठयावर कृषी अधिकारी यांनी धाड टाकून ५४ हजार रुपये किमतीच्या बॅग जप्त केल्या आहेत.

सविस्तर वृत असे कि, मिलिंद भागवत बीडबाग वय 37 वर्ष, व्यवसाय नोकरी खत निरीक्षक तथा मोहीम अधिकारी कार्यालय कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांच्या फिर्यादी वरून PPL Township paradeep 754145 कंपनीचे उत्पादित DAP (18-46-0) चे एकूण 50 किलो ग्रामचे 40 खताचे बॅग अंदाजे किंमत 54, 000 रूपये आरोपी नामदेव विश्वनाथ खेरडे माऊली कृषी सेवा केंद्र किनगाव ( फरार ) यांने प्यारादीप फॉस्फेट लिमिटेड P.O.PPL TOWNSHIP PARADEEP खताच्या कंपनीच्या नावाचा लोगो 744145 कंपनीचे उत्पादित DAP (18-46-0) खताच्या कंपनीच्या नावाचा लोगो व लेबल वापरून बनावटीकरण केलेल्या बॅग संशयास्पद व अनधिकृत रित्या खरेदी विक्री करून शासनाची व शेतकऱ्याची दिशाभूल करून फसवणूक केली. तसेच खत नियंत्रण आदेश 1985 मधील खंड5,8,19, व 21 नुसार उल्लंघन केले वगैरे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून पुढील तपास मा सपोनी सो खंदारे करीत आहेत.