३० एप्रिल पर्यंत ई-पिक पाहणी पूर्ण करावी: जिल्हाधिकारी

३० एप्रिल पर्यंत ई-पिक पाहणी पूर्ण करावी: जिल्हाधिकारी

प्रतिनिधी - साहिल रामटेके, भंडारा

शेतकऱ्यांनी स्वतः आपला पीक पेरा नोंदवल्यामुळे शेतकऱ्यांनी ई-पीक पाणी स्वयं प्रमाणित मानण्यात येणार आहे. पिकाची नोंद घेत असताना चुकीची नोंद असल्यास स्वतः शेतकऱ्यांना ४८ तासात दुरुस्त करता येईल.

उन्हाळी हंगाम २०२३-२४ पिक पाहणी कारवाई १५-एप्रिल २०२४ पासून  सुरू करण्यात आली आहे. तसेच ई-पिक पाहणी हे मोबाईल ॲप गूगल प्ले स्टोअरवर दिनांक १५ एप्रिल २०२४ पासून उपलब्ध करून देण्यात आले आहे.

त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपण यापूर्वी सदर या मोबाईलवर इन्स्टॉल केले असल्यास,त्याला अपडेट करावे, किंवा इन्स्टॉल करून परत गुगल प्ले स्टोअरवर सर्च करून इन्स्टॉल करावे. ई-पिक पाहणी हे मोबाईल ॲप आपल्या मोबाईल मध्ये नसल्यास गुगल प्ले स्टोअर वर सर्च करून इन्स्टॉल करावे व उन्हाळी हंगामातील ई-पीकपाहणी येत्या ३० एप्रिल २०२४ पर्यंत  विहित वेळेत पूर्ण करावे. तसेच पीक पाहणी करताना अडचणी आल्यास टोल फ्री क्रमांकावर कॉल करावे,असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.