पालखेड बंधारा परिसरात पोलिओ लसीकरण..
![पालखेड बंधारा परिसरात पोलिओ लसीकरण..](https://news15marathi.com/uploads/images/202403/image_750x_65e735528bfd2.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील मोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत पालखेड बंधारा येथील प्राथमिक उपकेंद्रात व अंगणवाडी केंद्र येथे पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत ० ते ५ या वयोगटातील बालकांना सरपंच रेखा गांगुर्डे सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण आरोग्य सेविका कुसुम चौरे यांच्या हस्ते डोस देण्यात आले.
तर अंगणवाडी येथे ही सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण यांच्या हस्ते पल्स पोलिओ डोस देण्यात आले. याप्रसंगी अंगणवाडी सेविका लता गोतरणे,सरला गोतरणे,ललिता शेलार, आशा रंजना कडाळे,मुक्ता कोकाटे, आदीसह महिला उपस्थित होत्या.