बोरसुरी येथे वीज पडून तरुणाचा मृत्यू...
![बोरसुरी येथे वीज पडून तरुणाचा मृत्यू...](https://news15marathi.com/uploads/images/202404/image_750x_66268a32ea91c.jpg)
प्रतिनिधी - सुधाकर सूर्यवंशी, निलंगा ( लातूर )
निलंगा तालुक्यातील बोरसुरी गावातील अतिशय गरीब कुटुंबातील मजुराचा वीज पडून सोमवारी ता. २२ रोजी मृत्यू झाला आहे.
बोरसुरी गावातील मुस्तफा शबिर पठाण वय वर्ष 34.! शेतावरून गावाकडे येत असताना अवकाळी पावसात 4:30 च्या सुमारास घराकडे येत असताना विज पडून मृत्यू झाला. हा तरूण गावातील तरुण, मजुरी करून खाणारा आहे. त्याच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, दोन लहान मुली असा परिवार आहे.