सत्यनारायण सॉ मील'च्या बाजूला, अनोळखी इसमाचा आढळला मृत्यदेह
![सत्यनारायण सॉ मील'च्या बाजूला, अनोळखी इसमाचा आढळला मृत्यदेह](https://news15marathi.com/uploads/images/202406/image_750x_665ca91c62280.jpg)
प्रतिनिधी - गजू कैलासवार, पाटणबोरी
यवतमाळ - काल दि. 1 जून रोजी पाटणबोरी येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 44 वर सत्यनारायण सॉ मील'च्या बाजूला अनोळखी इसमाचा.! लाल रंगाचा शर्ट व काळसर रंगाचा जीन्स पॅन्ट परिधान केलेला अंदाजे वय 30 ते 32 वेड सर इसम उन्हामुळे चक्कर येऊन मृत अवस्थेत दुपारी साडेतीन वाजताचे सुमारास आढळून आला आहे.
या वेडसर इसमाचे मागील दहा महिन्यापासून पाटणबोरी येथे वास्तव्य होते. उड्डाण पुलाच्या बाजूला असलेल्या स्वा मिल जवळ हा नेहमी दिसत होता. 1 जून रोजी दुपारी फिर्यादी विनोद वेनुदास कनाके आपल्या घराकडे जात असताना; सदर इसम मरण पावलेल्या अवस्थेत दिसून आला. उन्हामुळे चक्कर येऊन खाली दगडावर पडल्याने त्याचे डावे डोळ्याच्या वर भुवईला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तो अनोळखी असल्याने नातेवाईकांच्या शोध घेणे करिता पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.