BREAKING NEWS || किवळे येथे, होर्डिंग कोसळून पाच जणांचा मृत्यू...
![BREAKING NEWS || किवळे येथे, होर्डिंग कोसळून पाच जणांचा मृत्यू...](https://news15marathi.com/uploads/images/202304/image_750x_643d677799426.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : गणेश मोरे
पिंपरी चिंचवड : देहूरोड कात्रज बाह्यवळण महामार्गावर किवळे येथे; आज सायंकाळी होर्डिंग कोसळल्याने, या दुर्घटनेत होर्डिंगखली दबून पाच जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटणा घडली आहे.
सोमवारी सायंकाळी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात सोसाट्याचा वारा सुटला. यामध्ये देहूरोड कात्रज बाह्यवळण महामार्गावरील किवळे येथे रस्त्याच्या बाजूला लावलेले एक होर्डिंग कोसळले. या होर्डिंग खाली अडकून पाच जणांचा मृत्यू झाला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारी यांनी सांगितले की, साडेपाच वाजताच्या सुमारास किवळे येथे होर्डिंग पडल्याची माहिती मिळाली. त्यानुसार रावेत पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. कटरच्या सहाय्याने होर्डिंग कट करून, तसेच जेसीबीच्या सहाय्याने होर्डिंग बाजूला करण्याचे काम सुरू आहे. पुढील कारवाई पोलीस करत आहेत.