अरे या महिलांना झाले तरी काय? पोटच्या दोन लेकराणा सोडून महिला बेपत्ता...!

अरे या महिलांना झाले तरी काय? पोटच्या दोन लेकराणा सोडून महिला बेपत्ता...!

News15 मराठी प्रतिंनिधी आशिष ढगे पाटील

चाकण: मागील बर्‍याच दिवसापासून चाकण परिसरातील महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. यातील विशेष बाब म्हणजे ज्या महिला बेपत्ता झाल्या आहेत त्यातील बर्‍याच महिला या अनैतिक संबंधातून बेपत्ता झाल्या असल्याचे निदर्शनासं आले आहे.

अशीच काहीशी घटना चाकण औद्योगिक वसाहतीतील आंबेठाण गावात घडल्याचे समोर आले आहे. १५ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास रा.आंबेठाण, ता.खेड, जि.पुणे येथील वर्षा अतुल पाटील(वय-३० वर्षे) नावाची महिला स्वत:च्या लहान मुलाला मी तोंडाचे फेशियल करण्यासाठी दवणे वस्ती, आंबेठाण येथे जाऊन येते असे सांगून घरामधून निघून घेल्याची घटना घडली आहे.  नक्की आंबेठाणमध्येच अशा घटनांचे प्रमाण वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या मधून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

वर्षा पाटील हि महिला बेपत्ता झाल्यानंतर तिच्या पतीने तिची सर्वदूर शोधाशोध करून नही ती महिला कुठेहि मिळून न आल्याने तिचा पती अतुल गुलाबराव पाटील यांच्या तक्रारीनुसार महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात मिसिंग रजिस्टर ४६/२०२२ नुसार नोंद घेण्यात आली आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कुटुंब आणि कुटुंबातील सदस्य यांचीतील सुसंवाद अक्षरशा: हरवला असल्याचे दिसून येतं आहे. कुटुंबातील सदस्य यांच्याही आर्थिक, शारीरिक, मानशिक, कौटुंबिक गरजा वाढल्याने त्या भागवणे कुटुंब प्रमुखाला अवघड होत चालले आहे. त्यामुळेच अशा घटना जास्त घडत असल्याचे तज्ञाचे मत आहे. यासाठी कुटुंब प्रमुखाने आपल्या धकाधकीच्या जीवनात कुटुंबालाही तितकासा वेळ द्यायला हवा ज्यामुळे अशा घटना घडण्यापासून आळा बसण्यास मदत होईल.

या प्रकरणाचा पुढील तपास महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार रमेश धादवड हे करत आहेत.