नांदेड मध्ये 390 बंदुकीच्या गोळ्याचा साठा सापडला.! श्वान पथकाने केली पाहणी

नांदेड मध्ये 390 बंदुकीच्या गोळ्याचा साठा सापडला.! श्वान पथकाने केली पाहणी

प्रतिनिधी - मनोज मनपुर्वे

नांदेड एक धक्कादायक घटना घडली आहे. नांदेड शहरा जवळ असलेल्या वाडी बुद्रुक गावातील एका नाल्या जवळ बंदुकीच्या गोळ्यांचा साठा आढळलाय.जवळपास 390 पेक्षा जास्त बंदुकीच्या गोळ्यांचा हा साठा आहे.एका शेतकरी मुलाला हा साठा आढळून आल्या नंतर त्याने घरच्यांना ही माहिती दिली.या माहिती नंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत हा साठा जप्त केला आहे.ह्या बंदुकीच्या गोळ्यांचा साठा कोणी या ठिकाणी टाकला , याचा शोध आता नांदेड पोलीस घेताहेत

390 पेक्षा जास्त बंदूक गोळ्यांचा साठा आहे.  लाईट मशीन गणच्या गोळ्या असल्याची माहिती, LMG हे अत्यंत प्रतिबंधित शस्त्र, घटनास्थळी दहशतवाद विरोधी पथक, श्वान पथक दाखल होऊन तपासणी केली आहे