पुराच्या पाण्यात प्रवाशांसह ऑटो गेला वाहून.! सुदैवाने ऑटोतील तीन जण बचावले...

पुराच्या पाण्यात प्रवाशांसह ऑटो गेला वाहून.! सुदैवाने ऑटोतील तीन जण बचावले...

प्रतिनिधी - मनोज मनपुर्वे, नांदेड

रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अचानक ओढ्याला आलेल्या पुरात प्रवाशासह ऑटो वाहून गेल्याची धक्कादायक घटना नांदेडच्या किनवट तालुक्यातील कुपटी येथे घडलीय. कुपटी ते  नंदगाव जाणाऱ्या रस्त्यावरील  कुपट्टीच्या पुलावर पुराचे पाणी आले होते.या  ऑटोने दोन महिला आणि एक पुरुष हे तिघेजण कोसमेट हुन नंदगाव येथील नातेवाईकाकडे जात असताना कुपटी ते नंदगाव रोडवरील कुपटी येथील ओढ्याला अचानक आलेल्या पुराच्या पाण्याच्या प्रवाहात हा ऑटो प्रवाशासह वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली. 

मात्र सुदैवाने यातील ऑटो चालक परमेश्वर ढाले,लक्ष्मीबाई ढाले, आणि रंजनाबाई  टारपे  हे तिघेही बचावले.

पुराच्या पाण्याचा प्रवाह इतका होता की हा ऑटो पुराच्या पाण्यात जवळपास दीड किलोमीटर वाहत गेला.सुदैवाने या घटनेत कुठलिही जीवित हानी झाली नाही मात्र हे सर्व आदिवासी महिला व पुरुष ऑटोच्या व पुराच्या पाण्यातून बाहेर निघण्यासाठी एका झाडाच्या मुळीचा आधार घेत हे तिघेही बाहेर निघाल्याची माहिती या घटनेतील ऑटो चालक परमेश्वर ढाले यांनी दिलीय.