पाण्याच्या टाकीत पडून चिमुकलीचा मृत्यू.! लाखांदूर तालुक्यातील सरांडी बु. येथील घटना...
![पाण्याच्या टाकीत पडून चिमुकलीचा मृत्यू.! लाखांदूर तालुक्यातील सरांडी बु. येथील घटना...](https://news15marathi.com/uploads/images/202212/image_750x_638c450caab41.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : साहिल रामटेके
भंडारा : पाण्याच्या टाकीत पडून एका चिमुकलीच्या मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना लाखांदूर तालुक्यातील सरांडी बु. येथे घडली आहे. अंगणात असलेल्या पाण्याच्या टाक्यात पडून दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू.! शनिवार दि. 3 सप्टेंबर सकाळी 8 च्या सुमारास झाला आहे.
सानवी छत्रपाल कुथे दीड वर्ष असे मृत चिमुकलीचे नाव आहे. शनिवारी सकाळी सानवी लहान चिमुकल्यांसोबत अंगणात खेळत होती. मुलगी खेळत असल्याने आई घर कामात व्यस्त होती. काही वेळात घर काम आटोपल्यानंतर बघितले तर सानवी अंगणात दिसली नाही. शेजारी जाऊन विचारणा केली मात्र.! सानवी दिसली नाही. परिसरात शोधाशोध करण्यात आली. दरम्यान अंगणात असलेल्या पाण्याच्या टाकीत सानवी पडलेली दिसली. तिला तात्काळ पाण्याबाहेर काढून सरांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
प्राथमिक उपचार करून तिला लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र ग्रामीण रुग्णालयात नेत असतानाच वाटेतच सानवी'चा मृत्यू झाला. चिमुकलीच्या मृत्यूने सरांनी गावात हळहळ व्यक्त होत आहे.