अजय यमसनवार यांची भारतीय जनता पार्टीच्या केळापूर तालुका सरचिटणीस पदी निवड
![अजय यमसनवार यांची भारतीय जनता पार्टीच्या केळापूर तालुका सरचिटणीस पदी निवड](https://news15marathi.com/uploads/images/202403/image_750x_65fd832112628.jpg)
प्रतिनिधी गजू कैलासवार, यवतमाळ
पाटणबोरी येथील सामाजिक कार्यकर्ते अजय यमसनवार यांची; भारतीय जनता पार्टीच्या केळापूर तालुका सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे.
अजय यमसनवार हे भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते असून, गेल्या अनेक वर्षापासून पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करत आहे. ते पाटणबोरी ग्रामपंचायतची उपसरपंच होते. त्यांनी गावात अनेक सामाजिक कामे केली असल्यामुळे व पक्षाशी एकनिष्ठ असल्यामुळे आर्णी विधानसभेचे आमदार संदीप धुर्वे यांनी त्यांची निवड केली आहे. तर त्यांच्या या निवडीबद्दल त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.