MIM पक्षाचा ६५ वा स्थापना दिवस.! लातूरमध्ये उत्साहात साजरा...

MIM पक्षाचा ६५ वा स्थापना दिवस.! लातूरमध्ये उत्साहात साजरा...

NEWS15 प्रतिनिधी : असलम शेख

लातूर : ऑल इंडिया मज़लिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमिन (AMIM) पक्षाचा ६५ वा स्थापना दिवस.! पक्षाचे मध्यवर्गीय कार्यालय लातूर येथे पक्षाचा झेंडा फडकाउन साजरा करण्यात आला. MIM चे जिल्हा अध्यक्ष ॲड. मुहम्मद अली शेख यांच्या हस्ते पक्षाचे चिन्ह असलेला ध्वज फडकाऊन, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्थापना दिवस संपन्न झाला.

एमआयएम पक्षाची स्थापना १९५७ साली अब्दुल वाहेद उवैसी यांनी केली. आज पक्षाने ६५ वर्ष पूर्ण केले आहेत. याप्रसंगी लातुर शहर अध्यक्ष मुजीब हमदुले, शहर कार्यकारी अध्यक्ष जावेद पटेल, शहर उपाध्यक्ष शेख सत्तार, उपकार्यकारी शहर अध्यक्ष सय्यद इनाम, शहर सचिव सय्यद नाईमुद्दीन, औसा शहर अध्यक्ष सय्यद कलीम तसेच ऑल इंडिया मज़लिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमिन पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.