राजकीय : खेड खरेदी विक्री संघ निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या गटाकडून नवी राजकीय खेळी...!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : खेड खरेदी विक्री संघाच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वसाधारण अ वर्ग चाकण गटातूमधून उमेदवारी अर्ज दाखल केलेले धोंडिबा कुंडलिक पवळे यांनी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या गटाचे संभाजी बाळासाहेब दौंडकर यांना पाठींबा देऊन धक्का तंत्राचा वापर केला आहे.
दौंडकर यांना धोंडिबा पवळे यांनी पाठिंबा दिल्याने चाकण गटात संभाजी दौंडकर यांचा विजय निश्चित मानला जात आहे. खेड खरेदी विक्री संघाची निवडणूक चाकण गटात अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे. आता सरळ संभाजी दौंडकर आणि अशोक मांडेकर यांच्यात काटे की टक्कर होणार असल्याचे दिसून येत आहे. पण पवळे यांच्या पाठिंब्याने संभाजी दौंडकर यांच्यासाठी निवडणूक काहीशी सोप्पी झाल्याची चर्चा तालुक्यात रंगताना दिसत आहे.