कोचिंग क्लासेस नियंत्रण कायद्यावर संघटनेचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन...

कोचिंग क्लासेस नियंत्रण कायद्यावर संघटनेचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन...

नाशिक - प्रतिनिधी 

राज्य विधानसभेच्या चालू अधिवेशनात कोचिंग क्लासेस नियंत्रण आणि नियमन विधेयक सादर होणार आहे. या विधेयकामुळे कोचिंग क्लासेसना आता शासकीय परवानगी आणि विविध सुविधा पुरवण्याची अट बंधनकारक होणार आहे.

या पार्श्वभूमीवर, सर्वसामान्य क्लासेस चालकांना अडचणी येऊ नयेत यासाठी साध्या व सुलभ नोंदणी प्रक्रियेसह नियम बनवावेत अशी मागणी करत संघटनेने शिक्षणमंत्री दादा भुसे यांची भेट घेतली. संघटनेने त्यांना निवेदन सादर करून क्लासेस व्यवसायाला अडथळा निर्माण होणार नाही याची हमी मागितली.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे, उपाध्यक्षा विद्या राकडे, प्रतिभा देवरे, रोहिणी भामरे, कांता घाडगे, शिवाजीराव कांडेकर आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

शिक्षणमंत्र्यांनी विधेयक सादर होईल, पण व्यवसायाला बाधा येणार नाही यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.