विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने पथसंचलन...

विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने पथसंचलन...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - दिनदयाल गिऱ्हेपूंजे, लाखनी-पालांदूर

पालांदूर येथे विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर; गोविंद विद्यालयाच्या भव्य मैदानातून ढोलाच्या गजरात वाजत - गाजत शिस्तबद्ध पद्धतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने; दि. २६ ऑक्टोम्बर रोजी सायंकाळी स्वयंसेवक आणी नागरिकांच्या उपस्थित पथसंचलन काढण्यात आले.

यावेळी अंदाजे १०० ते १५०  स्वयंसेवकांनी यात सहभाग घेतला होता. या आयोजित कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ.अभय हजारे, पालांदूर हे उपस्थित होते. तसेच प्रमुख वक्ते म्हणून  विभाग प्रचारक  सुजितजी कुंभालकर यांचा सहभाग लाभला. यावेळी स्वयंसेवकांना अल्पोहाराची  व्यवस्था केली होती. तसेच तालुका कार्यवाह कृष्णाजी भुते व तालुका कार्यकारणी यांच्या नेतृत्वात हा  कार्यक्रम पार पडला.