आशा सेविका व गटप्रवर्तक यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन...
![आशा सेविका व गटप्रवर्तक यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन...](https://news15marathi.com/uploads/images/202310/image_750x_653ba01d93806.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - राजु जांभुळे, भिवापूर
आशा सेविकांना दिवाळी बोनस आणि प्रसृती रजा यासह इतर मागण्याबाबत; भिवापूर तालुक्यातील आशा सेविका व गटप्रवतकांनी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून, शासनाच्या विरोधात निर्देशने केली आहेत.
सदरचे आंदोलन आयटक या युनियनच्या माध्यमातून सुरु असून, भिवापूर तालुक्यातील आशा सेविका व गटप्रवर्तक आज एकत्र येत; तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला सुरवात करण्यात आली.
यावेळी ६० आशा व गटप्रवर्तक यांची उपस्थिती होती. जोपर्यत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही. तोपर्यत आदोलन सुर राहणार असल्याचे आशा राष्ट्रीय अध्यक्ष मंगला पंकज पांडे, शोभा लांबट, गटप्रवतेक रत्नमाला शेंडे यांनी यावेळी सांगितले.