नीटची परीक्षा पुन्हा घ्या.! नांदेडमध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर...

नीटची परीक्षा पुन्हा घ्या.! नांदेडमध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - मनोज मनपुर्वे, नांदेड

नीट परीक्षा निकालानंतर अनेक आक्षेप घेतले जात आहेत. या परीक्षेच्या विरोधात नांदेड युवक काँग्रेसच्यावतीने मोर्चा काढण्यात आला आहे. या नीट परीक्षेचा अभ्यास करणारे नांदेड येथील हजारो विद्यार्थ्यांनी या मोर्चात सहभागी झाले होते. 

वेळ कमी पडला म्हणून ग्रेस मार्क देता येणार नाहीत.! अभ्यास करणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांवर NTA ने अन्याय केला आहे. या प्रकरणात दोषी असलेल्या सर्वांची चौकशी करून कठोर शिक्षा करण्यात यावी; सर्व विद्यार्थ्यांची नीट ची परीक्षा पुन्हा घेण्यात यावी; तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीखाली एसआयटी किंवा सीबीआय मार्फत निकालाची चौकशी करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.