विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचा देवणी तहसिल कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा...

विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचा देवणी तहसिल कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा...

प्रतिनिधी - सुधाकर सूर्यवंशी, देवणी (लातूर)

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्यावतीने, लातूर जिल्ह्यातील देवणी तहसील कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा 16 ऑगस्ट रोजी काढण्यात आला.

शहरातील बोरोळ चौक ते देवणी तहसील कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अनेक शेतकरी ट्रॅक्टरसह सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांना गतवर्षीच्या खरिपाचा पीकविमा मिळावा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, वन्य प्राण्यांपासून पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर तारेचे कुंपण द्यावे, यासह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर संघटनेच्यावतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

या मोर्चात देवणी तालुक्यातील अनेक शेतकरी सहभागी झाले होते.