कर वाढ रद्द करा.! उमरखेडकरांचा नगर पालिकेवर धडक मोर्चा...
प्रतिनिधी - किरण मुक्कावार, उमरखेड
नवीन मालमत्ता कर आकारणी रद्द करून जुनीच कर आकारणी पद्धत सुरु ठेवा या प्रमुख मागणीसाठी उमरखेडकरांनी पुरोगामी युवा ब्रिगेड च्या पुढाकारातून नगर पालिकेवर धडक देत निवेदन दिले. नगरपालिका उमरखेड ने चालू वर्षात नुकतीच मोठ्या प्रमाणात कर वाढ आकारणी सुरू केली असून सदर कर आकारणी संबंधित नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत . अनेक नागरिकांचा यावर रोष आहे. आरोग्य, शिक्षण आदी विषयांवरदेखील मोठ्या प्रमाणात कर वाढ केली आहे. या अन्यायकारक कर आकारणी रद्द व्हावी यासाठी उमरखेडकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत उमरखेड नगरपालिकेवर धडक दिली व मुख्याधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी अनेक सामजिक संघटनेचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, युवा, महीला व शेतकरी उपस्थित होते.
सदर मोर्चा यशस्वी व्हावा यासाठी पुरोगामी चे जिल्हाध्यक्ष शिवशंकर सुरोशे, भागवत सूर्यवंशी, जाकिर राज, सिद्धार्थ मुनेश्र्वर, अनिल हरणे, गजानन गायकवाड, नवनाथ जाधव, हिरांसिंह जाधव, आकाश लोमटे, योगानंद जाधव, राजेश वाढे, अंबादास गव्हाळे, मनोज धूळध्वज, नागराज दिवेकर, मुक्तार शाह, दत्ता दिवेकर, ताहेर शाह, महेश अन्नछत्रे, प्रवीण बारापत्रे, सिराज खान, संदिप मवाडे, अजय शेळके , माजीद पठाण पुरोगामी युवा ब्रिगेड च्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या मोर्चामध्ये खालील संघटनेचा सहभाग होता यामध्ये
प्रहार, भीम टायगर सेना, रिपब्लिकन पक्ष, राष्ट्रवादी(अजित पवार) ,राष्ट्रवादी युवक आघाडी ( शरद पवार ) शिवसेना (ठाकरे गट ) , बळीराजा पक्ष, शेतकरी कष्टकरी संघ आदींनी पाठींबा दिला.