लातूरात रस्त्यांवर खड्डे.! प्रभुराज प्रतिष्ठानचे अनोखे आंदोलन...

प्रतिनिधी - असलम शेख, लातूर
लातूर शहरातील अनेक रस्त्यांवर पडलेले खड्डे नागरिकांना त्रासदायक ठरत आहेत. या समस्येकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या महापालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी प्रभूराज प्रतिष्ठान आणि मनसे विधी आघाडीच्यावतीने; आज शहरातील सावेवाडी भागात अनोखे आंदोलन करण्यात आले.
यावेळी कुंभकर्णाची वेशभूषा परिधान करून कुंभकर्णासारखे झोपी गेलेल्या प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच महापालिका प्रशासन जागे व्हा, अश्या आशयाचे बॅनर हाती घेऊन शहरातील खड्ड्यांच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.