सणासुदीच्या काळात लाल परी रुसली.! नांदेड विभागातील 80 टक्के कर्मचारी संपावर...
NEWS15 मराठी प्रतिनिधी - नांदेड
ऐन सणासुदीच्या काळात लाल परी रुसली रुसली असून, नांदेड विभागातील जवळपास 80 टक्के कर्मचारी संपावर गेल्याचे दिसत आहे. 530 पैकी केवळ 51 एसटी बस रस्त्यावर असून, नांदेड विभागातील 3 हजार 27 कर्मचाऱ्यांपैकी 20 टक्के कर्मचारी कामावर हजर आहेत.
तर नांदेड विभागातील नऊ आगारांना फटका बसला आहे. नांदेड विभागात जवळपास दीड लाख प्रवासी दररोज एसटी बसने करता ये जा करतात; दररोज 50 लाख रुपयांची उलाढाल होते.
काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या...
1)राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे.
2) कामगार कराराच्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांना देय होणारा थकबाकी महागाई भत्ता मिळणेबाबत
3) घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढ थकबाकी अदा करावी
4) सन 2016 -2020 या कालावधीसाठी जाहिर केलेल्या रू.4849 कोटीमधील शिल्लक रक्कम वाटप करावी
5) सर्वच कामगारांच्या मूळ वेतनात सरसकट 5000 रुपयांची वाढ करावी.