वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी संघटनेच्यावतीन, कंत्राटी भरती विरोधात आंदोलन...

NEWS15 मराठी प्रतिनिधी : असलम शेख, लातूर
वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांच्यावतीने, कंत्राटी नोकर भरतीचा शासकीय आदेश तात्काळ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी लातूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क ते जुने जिल्हाधिकारी कार्यालयवर मोर्चा काडण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले.
कंत्राटी नोकर भरती रद्द करा - शाळा वाचवा असे फलक हातात घेऊन, हजारो विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क ते जुने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. खाजगीकरण तात्काळ बंद करावे, कंत्राटी पद्धतीने नियुक्त रद्द करा, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करणे थांबवा, अनेक परीक्षा एक परीक्षा शुल्क असे धोरण सरकारने राबवावे; अशा मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात आल्या होत्या. या मोर्चात तरुण विद्यार्थ्यांनी मोठा संख्येने सहभाग नोंदवला होता.