दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदी योगेश बर्डे यांची निवड

दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदी योगेश बर्डे यांची निवड

 प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी क्रुषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी योगेश बर्डे यांची बिनविरोध निवड झाली.

बाजार समितीच्या सभागृहात आज शुक्रवार दि.२६ रोजी दुपारी झालेल्या संचालकांच्या बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक महेश भडांगे यांच्या उपस्थितीत शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पडली. 

यावेळी उपसभापती पदासाठी योगेश बर्डे यांचा एकमेव अर्ज आला सूचक म्हणून गंगाधर निखाडे हे होते. तर पांडुरंग गडकरी यांनी अनुमोदन दिले.त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी महेश भडांगे यांनी बर्डे यांची बिनविरोध निवडीची घोषणा केली.निवड होतच नागरिकांनी शेतकऱ्यांनी फटाक्यांची आतषभाजी केली.यावेळी योगेश बर्डे यांनी सांगितले की आपण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावू असे सांगितले.निवडी नंतर सभापती प्रशांत कड व संचालकांच्यावतीने तसेच दिंडोरी तालुका पत्रकार संघानेही सत्कार करण्यात आला. 

यावेळी सभापती प्रशांत कड,माजी उपसभापती कैलास मवाळ,गंगाधर निखाडे,दत्तु भेरे,पांडुरंग गडकरी,नरेंद्र जाधव, बाळासाहेब पाटील,शाम बोडके,दत्ता शिंगाडे,दत्तू राऊत नंदलाल चोपडा,अमित चोरडिया अर्चना अपसुंदे सचिव जे.के जाधव आदी संचालक उपस्थित होते.त्यांच्या निवडीचे मा.आमदार रामदास चारोस्कर,गणपतबाबा पाटील सुनिताताई चारोस्कर रमेश बोरस्ते, विलास कड,सुनिल आव्हाड,सुभाष देशमुख,राजेंद उफाडे, वाळू जगताप,नितिन धिंदळे,ॲड प्रदिप घोरपडे,गणेश बोरस्ते,गोपीनाथ पाटील, दशरत उफाडे, संगम देशमुख, सचिन बर्डे,विनायक शिंदे,लहानू पाटील,तुकाराम जोंधळे,आदिसह तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.