मडकीजांब येथे श्री सिद्धेश्वर महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रम आयोजन
![मडकीजांब येथे श्री सिद्धेश्वर महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रम आयोजन](https://news15marathi.com/uploads/images/202404/image_750x_662269b7e4185.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील मडकीजांब येथे श्री सिद्धेश्वर महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, यानिमित्त २१ एप्रिल रोजी ह.भ.प विवेक महाराज केदार यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तीन दिवस चालणाऱ्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात; प्रथमदिवशी भगवान श्री शंकरांच्या नुतन शिवलिंग पिंडीची गावातून मिरवणूक व शोभायात्रा काढण्यात आली. यात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नुतन शिवलिंगाच्या मुर्तीचे पुजन करून स्वागत केले. पुरोहित उमेश मुळे यांच्या व इतर ब्राह्मण वृंदाच्या हस्ते मुर्तीचे विधीवत पुजन करून प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास व कीर्तनास पंचक्रोशीतील भाविकांनी उपस्थित राहुन महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मडकीजांब ग्रामस्थांनी व सिध्देश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा नियोजन समितीने केले आहे.