दिंडोरी लोकसभेसाठी धनवान भारत पार्टीची धोंडीराम थैल यांना उमेदवारी

दिंडोरी लोकसभेसाठी धनवान भारत पार्टीची धोंडीराम थैल यांना उमेदवारी

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी : राज्यात होवू घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून,दिंङोरी लोकसभा मतदार संघात धनवान भारत पार्टीच्यावतीने,पंचायत समिती माजी सदस्य ह.भ.प.धोंडीराम महाराज थैल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दिंङोरी तालूक्यातील चौसाळे येथील ग्रामपंचायतमध्ये सलग चार पंचवार्षिक सरपंचपद भोगलेले,  समाज कार्यात सदैव अग्रेसर असलेले,आदिवासी सेवक म्हणून ओळख असणारे व ज्यांचा सर्वत्र  परिचय असलेले,दिंङोरी पंचायत समिती माजी.सदस्य व वारकरी सांप्रदायामध्ये ठसा उमटवलेले  ह.भ.प.धोंडीराम महाराज थैल यांची भारत धनवान पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष परब साहेब यांनी दिडोरी लोकसभासाठी उमेदवारी जाहिर केली आहे.

दिंङोरी लोकसभेसाठी धोंडीराम थैल यांची महाराष्ट्राचे राज्यध्यक्ष भगवान बोराडे,बहुजन समाज पार्टीचे अध्यक्ष रमेश पवार , शेतकरी किसान विकास किसान पार्टीचे अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांचे उपस्थितीत मुंबई येथे उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे.