सोनजामच्या भजन स्पर्धेत संत पाटील बाबा भजनी मंडळ प्रथम...

सोनजामच्या भजन स्पर्धेत संत पाटील बाबा भजनी मंडळ प्रथम...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील सोनजाम येथे ज्ञानगंगा बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था व ग्रामस्थांच्यावतीने आज रविवार दि.१८ रोजी आयोजित भजन स्पर्धेत जोपुळ येथील संत पाटील बाबा भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला तर निफाड तालुक्यातील कारसुळ येथील प्रभात बाल भजनी मंडळ तृतीय क्रमांक चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथील गुरुदत्त भजनी मंडळाने पटकावला उत्तेजनार्थ म्हणून दिंडोरी तालुक्यातील पिंपरी अंचला येथील महारुद्र भजनी मंडळ आमदा पळसन येथील भक्ती सरगम भजनी मंडळ यांना बक्षीस देण्यात आले. 

यावेळी स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ह.भ.प. शिवराम महाराज बोराडे व ह.भ.प. मुक्ताताई सोनवणे यांनी काम पाहिले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार भास्कर भगरे व संगमनेर येथील प्राचार्य अशोक बागुल, राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे तालुकाध्यक्ष कृष्णा मातेरे ज्येष्ठ नागरिक बाकीराव पाटील सामाजिक कार्यकर्ते कचरू पाटील बापू चव्हाण पत्रकार बाळासाहेब अस्वले सचिन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी खासदार भास्कर भगरे यांनी सांगितले की आजच्या युगात हे संस्कार काही अंशी लोक पावत चालले असले तरी अशा स्पर्धांमुळे धार्मिकतेला वाव मिळते संस्थेचे कौतुक करून संस्थेतर्फे यापुढेही असेच कार्यक्रम चालू ठेवावे त्यासाठी लागेल ते सहकार्य करणार असल्याचे सांगून संस्थेचे पदाधिकारी संपत जाधव व सचिन कड हे कायमच समाज हितासाठी काम करत असून यामध्ये आरोग्य शिबिर मॅरेथॉन स्पर्धा सामाजिक पुरस्कार असे नवनवीन समाज उपयोगी काम करत असल्याचे सांगून संस्थेचे कौतुक केले. प्रा. अशोक बागुल यांनी ही आपले मनोगत व्यक्त करून संस्थेच्या उपक्रमाबाबत दाद दिली. तसेच समाज उपयोगी कार्यक्रम करत राहा आम्ही तुमच्या बरोबर आहोत असे सांगितले.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भजनी मंडळांना पारितोषिक देण्यात आली. 

याप्रसंगी पोपटराव जाधव राजेंद्र जाधव दशरथ जाधव देवेंद्र जाधव किरण जाधव दीपक जाधव प्रवीण गायकवाड हिरामण जाधव अभय बोरसे अभय सूर्यवंशी दिलीप चौधरी आधी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संपत जाधव यांनी केले तर आभार केदारनाथ हरीचंद्र यांनी मानले.